श्री कालरात्रीदेवी
कल्पांत कालीन रात्र . विश्व प्रलयाच्या वेळी संहार कारिणी पराशक्ती महाकाला मध्ये विलीन होते त्यावेळी सर्वत्र घोर अंधाराचे साम्राज्य पसरते . या प्रलयापूर्व अंधाकाराचे प्रतिक म्हणून तंत्र शास्त्रात काळरात्रीची कल्पना केलेली आहे . यातला रात्री शब्द अंधकाराचा सूचक आहे .कालरात्री नावाचा एक प्राचीन तंत्र ग्रंथ आहे .त्यात कालारात्रीच्या उपासनेचे विधान दिलेले आहे . या कालारात्रीचे ८४ भेद मानलेले आहेत .त्याचे पृथक मंत्र आहेत,यंत्रेही आहेत ,त्याच्या सिद्धीही वेगवेगळ्या आहेत .
उपासनेचे प्रकार - अमावास्येच्या रात्रीला कालारात्रीचे प्रतिक मानून तिचे मोहरात्री .दारुण रात्री ,महारात्री व कालरात्री असे चार विभाग केलेले आहेत .निशासाधना,भैरवी साधना ,काली साधनाव प्रकृती साधना अशा त्या चार विभागाच्या अनुक्रमे साधना सांगितलेल्या आहेत . कालरात्रीच्या उपासनेला कार्तिकी अमावास्या हि विशेष सांगितली आहे श्री विद्यार्णव तंत्रात कालरात्रीचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगितले आहे .
रक्तवर्ण ,चत्रभुज .उजव्या हाती लिंग ,दुसर्या हाताची वरद मुद्रा ,दोन डाव्या हाती भुवन व अधोदंड .त्रिनेत्र ,मुक्तकेशी ,मस्तकी मयूर पत्र धारण करणारी व कामातुर .
कालरात्रीचे यंत्र-बाहेरच्या वर्तुळात सोळा पाकळ्या व आतल्या वर्तुळात आठ पाकळ्या ,त्याच्या आत षट्कोन,त्यात वर्तुळ व वर्तुळात बिंदू अशीच या यंत्राची रचना असते .या यंत्रावर काळरात्रीची स्थापना व पूजा करतात कामना परत्वे कालरात्रीचे भिन्नभिन्न विधाने सांगितलेली
No comments:
Post a Comment