Tuesday, 11 October 2011

Kojagiri pournima poojan

समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून देवी महालक्ष्मी, चंद्र व पांढरा शुभ्र ऐरावत बाहेर आले. कोजागिरी पौर्णिमेस या तीन देवतांचे पूजन करतात. 

नवान्न पौर्णिमा


॥ श्री लक्ष्मी आरती ॥


जय जय ऐश्वर्य वैभवशाली धनदायी तू सर्वाते 
अगाध महिमा तव चरणाचा, वर्णाया मज शब्द नसे ।।धृ।।

क्षीरसागरी तो वास तुझा गे 
विष्णुपत्नी तू महामाया ।
पद्म धारिणी पद्म निवासिनी 
उद्योगी गृही तू नित्य वसे ।।

तुझ्या कृपेने दुःख न येते, 
सर्व असंभव संभव होते 
सर्वही अपुरे तुझ्याविना ते 
तुझ्या विना मन घाबरते ।।

Monday, 10 October 2011

नवान्न पौर्णिमा



कोजागिरी पौर्णिमा



कोजागिरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी व इंद्र ह्यांचे पूजन केले जाते. याच दिवशी कुलधर्महि केला जातो व नवान्न प्रश्न केले जाते. या दिवसापासूनच कार्तिक स्नानाचा आरंभ होतो. या दिवशी ज्येष्ठ आपत्त्यास ओवाळले जाते. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून प्राशन केले जाते.

Friday, 7 October 2011

aarati

उदो उदो श्री जय अंबे,नमो  नमः श्री जगदंबे||
अंतरंग हे रंगी  रंगले ,तव पदी मन डोले
भावातीत होवानिया  तव पदी आनंदे
सिद्धासन हे ध्यान धारणा 
माउली तू गे विश्वाची 
अपूर्व आरती करीता तव पदी आनंदे 
अमृताने न्हाऊ घाली सिध्दी योगिनी कुंडलिनी 
आनंदमय शालू तनुवरी या ल्याले 
चौसष्ट योगिनी नवदुर्गा तू अष्टसिद्धी त्या तुझी रूपे 
सगुण गुणातीत माया परी निर्गुण तू गे 
जन्म मरण हे नाही तुजसी परी भक्ताच्या हाकेला 
अनंत रूपे नटसि तूची दयाघन गे 
स्तुती सुमनाच्या करी  वर्षावा देव तुझ्यावर स्वर्गीचे 
प्रसन्न होऊनी त्याना देई अभयाते
संसाराच्या माया जाळी  घिरट्या घेई मन वेडे 
भार तुझ्यावर घालूनी मोहन हा चाले 

Tuesday, 4 October 2011

Ashtami









शिवरूपा देवी त्रिपुरसुंदरी शिवध्येयां सनातनी |
शिवप्रिया माहेश्वरी सती गौरी सुभगा त्रिलोचनी |
दशभुजा पंचमुखी श्वेत्वणी त्रैलोक्य वरदायिनी |
विघ्ननाशिनी वृषभवाहिनी विश्वेश्वरी गीरीनंदिनी |
अशा अवतारी माहेश्वारीला नमस्कार करीते कुलस्वामिनीला ||


ashtnaaikaa

महामाया तमोगुणी महाकाली 
मधु कैटभ मर्दिनी काजळा एसी दिसे काळी 
दशभुज दशपाद  दशानना  सावळी
हरीची योगनिद्रा  भगवती  चांगली 
जय महाकाली तुज नमो 

सर्व देवातामय त्रिगुण रुपिणी
महिषमर्दिनी अष्टादशा भुजा धारिणी 
सकळाच्या  आदीची जाण नारायणी 
जय महालक्ष्मी तुज नमो 

वेद गर्भा महाविद्या कामधेनु भारती 
गौरी देहापासून जियेची उत्पती 
शुंभ निश्नुभ मर्दिनी  भवानी भगवती 
जय महासेस्वती तुज नमो 
इंदिरा कमला श्री लक्ष्मी सुखदायी 
सुवर्ण मयी  कांती दिसते वसे सरोजी 
स्तवन पूजने भक्तासी प्रेममयी 
जय नंदा देवी तुज नमो 

रक्तवर्ण रक्त वसनी रक्त भूषणे सर्वांगी 
रक्त उपचार प्रिय असे ती रक्तांगी 
व्यापुनी उरली रक्त चामुंडा  सकळ जगी 
जय योगेश्वरी तुज नमो 

अयोनिज स्वरूपा शत नेत्र शाकंबरी 
नीलवर्णी  नील लोचना  कालिका गौरी 
दुर्गमासुरा  वधुनी दुर्गा परमेश्वरी 
जय शांकरी तुज नमो 

नीलवर्ण नील वस्त्राकिंता  देवी एकविरा 
काम दात्री  सदा भक्तासी  पावे सत्वरा 
रूप भयंकर धरिले  संहाराया असुरा 
कालरात्री होई विख्यात या भूवर 
जय भिमादेवी तुज नमो 

चित्र वर्णी  भ्रमर रुपी देवी अंबा  भ्रामरी 
भ्रमर पंक्ती  गुंजारव  रुपी एसी महामारी 
अरुणासुरा मर्दुनी  त्रैलोक्य सुंदरी 
जप ध्यान पूजन स्मरणे  भक्ता तारी 
जय भ्रामरी तुज नमो 

कार्यानुसार अवतार घेतसे  अंबा निरंतर 
केले शत्रू निर्दालन  वेळी वेळी  सत्वर 
व्यापुनी उरली शून्य  साक्षी चराचर 
आदी शक्ती महाशक्तीला  त्रिवार नमस्कार 








जय जगदंबे तुज नमो 

Monday, 3 October 2011

ब्रह्मरूपा ब्रह्ममाया देवी परब्रह्मस्वरूपिणी 
वागीश्वरी कुमुदि ख्याता विद्या अविद्यास्वरूपिणी |
षड्भुजा चतुर्मुखी स्वरणांगी व्यक्ता अव्यक्तारुपिणी |
मृगचर्मधारी कमाललोचनी शारदा हंसवाहिनी |
अशा अवतारी ब्रह्माणीला नमस्कार करिते कुलस्वामिनीला ||

shree mahalakshmidevi navraatri