ॐ नमो आद्य रूपे देवी भगवती माते
कालिका कामरूपे ,शक्ती तू जगन्माते |
वैष्णवी भूतमाया ,मूळपीठ देवते
झालीया भेटी तुझी ,निवारिती पापाते |
जय जय श्री कुलदेवते ,महालक्ष्मी ग माते
आरती घेउनिया ओवाळीन मी तू ते ||धृ ||
अंबिका भद्र काली,देवी आद्या कुमारी |
मारिले चंडमुंड महिषासुर हे वैरी
हर्षले देव द्विज .गाती जयजयकारी |
उजळूनिया दीपमाळ,ओवाळीती नरनारी |
परिधान हेमवर्ण .कंठी नवरत्ने हार
करतळे रातोत्पळे,अदभूत जयजयकार |
अवतार कोलापुरी ,केला प्रताप थोर
मारिले दैत्य विकट, अघट कोल्हासूर |
नासिकी मुक्ताफळ ,रत्न कुंडले श्रवणी
घवघवीत नुपुरे हो ,अंदु वाजती श्रवणी
मस्तकी पुष्पहार दिसे ,पृष्टीवरी रुळे वेणी ||
नवकोटी कात्यायनी ,चतु :षष्टी योगिनी
भूचरे जलचरे आई ,तुज पासुनी |
एसी तू महालक्ष्मी ,जगत्राची जननी
नामया विष्णू दासा तुझे चिंतन ध्यानी ||
No comments:
Post a Comment