Friday, 4 November 2011
Wednesday, 26 October 2011
Sunday, 23 October 2011
Tuesday, 11 October 2011
॥ श्री लक्ष्मी आरती ॥
जय जय ऐश्वर्य वैभवशाली धनदायी तू सर्वाते ।
अगाध महिमा तव चरणाचा, वर्णाया मज शब्द नसे ।।धृ।।
क्षीरसागरी तो वास तुझा गे
विष्णुपत्नी तू महामाया ।
पद्म धारिणी पद्म निवासिनी
उद्योगी गृही तू नित्य वसे ।।
तुझ्या कृपेने दुःख न येते,
सर्व असंभव संभव होते
सर्वही अपुरे तुझ्याविना ते
तुझ्या विना मन घाबरते ।।
Monday, 10 October 2011
कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी व इंद्र ह्यांचे पूजन केले जाते. याच दिवशी कुलधर्महि केला जातो व नवान्न प्रश्न केले जाते. या दिवसापासूनच कार्तिक स्नानाचा आरंभ होतो. या दिवशी ज्येष्ठ आपत्त्यास ओवाळले जाते. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून प्राशन केले जाते.
Friday, 7 October 2011
aarati
उदो उदो श्री जय अंबे,नमो नमः श्री जगदंबे||
अंतरंग हे रंगी रंगले ,तव पदी मन डोले
भावातीत होवानिया तव पदी आनंदे
सिद्धासन हे ध्यान धारणा
भावातीत होवानिया तव पदी आनंदे
सिद्धासन हे ध्यान धारणा
माउली तू गे विश्वाची
अपूर्व आरती करीता तव पदी आनंदे
अमृताने न्हाऊ घाली सिध्दी योगिनी कुंडलिनी
आनंदमय शालू तनुवरी या ल्याले
चौसष्ट योगिनी नवदुर्गा तू अष्टसिद्धी त्या तुझी रूपे
सगुण गुणातीत माया परी निर्गुण तू गे
जन्म मरण हे नाही तुजसी परी भक्ताच्या हाकेला
अनंत रूपे नटसि तूची दयाघन गे
स्तुती सुमनाच्या करी वर्षावा देव तुझ्यावर स्वर्गीचे
प्रसन्न होऊनी त्याना देई अभयाते
संसाराच्या माया जाळी घिरट्या घेई मन वेडे
भार तुझ्यावर घालूनी मोहन हा चाले
Tuesday, 4 October 2011
ashtnaaikaa
महामाया तमोगुणी महाकाली
मधु कैटभ मर्दिनी काजळा एसी दिसे काळी
दशभुज दशपाद दशानना सावळी
हरीची योगनिद्रा भगवती चांगली
जय महाकाली तुज नमो
सर्व देवातामय त्रिगुण रुपिणी
महिषमर्दिनी अष्टादशा भुजा धारिणी
सकळाच्या आदीची जाण नारायणी
जय महालक्ष्मी तुज नमो
वेद गर्भा महाविद्या कामधेनु भारती
गौरी देहापासून जियेची उत्पती
शुंभ निश्नुभ मर्दिनी भवानी भगवती
जय महासेस्वती तुज नमो
इंदिरा कमला श्री लक्ष्मी सुखदायी
सुवर्ण मयी कांती दिसते वसे सरोजी
स्तवन पूजने भक्तासी प्रेममयी
जय नंदा देवी तुज नमो
रक्तवर्ण रक्त वसनी रक्त भूषणे सर्वांगी
रक्त उपचार प्रिय असे ती रक्तांगी
व्यापुनी उरली रक्त चामुंडा सकळ जगी
जय योगेश्वरी तुज नमो
अयोनिज स्वरूपा शत नेत्र शाकंबरी
नीलवर्णी नील लोचना कालिका गौरी
दुर्गमासुरा वधुनी दुर्गा परमेश्वरी
जय शांकरी तुज नमो
नीलवर्ण नील वस्त्राकिंता देवी एकविरा
काम दात्री सदा भक्तासी पावे सत्वरा
रूप भयंकर धरिले संहाराया असुरा
कालरात्री होई विख्यात या भूवर
जय भिमादेवी तुज नमो
चित्र वर्णी भ्रमर रुपी देवी अंबा भ्रामरी
भ्रमर पंक्ती गुंजारव रुपी एसी महामारी
अरुणासुरा मर्दुनी त्रैलोक्य सुंदरी
जप ध्यान पूजन स्मरणे भक्ता तारी
जय भ्रामरी तुज नमो
कार्यानुसार अवतार घेतसे अंबा निरंतर
केले शत्रू निर्दालन वेळी वेळी सत्वर
व्यापुनी उरली शून्य साक्षी चराचर
आदी शक्ती महाशक्तीला त्रिवार नमस्कार
जय जगदंबे तुज नमो
Subscribe to:
Posts (Atom)