Friday, 30 September 2011

नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा का करायची?



संवत्सरामध्ये नव दिन ।। नवरात्रमहात्म्य थोर जाण ।। व्हावयाचे काय कारण ।। एकाग्र चित्ते श्रावण करा ।। पुलस्तीच्या वंशी जन्मले ।। रावण-कुंभकर्ण बरे मातले ।। सर्व देव बंदी घातले ।। कार्यी योजिले सर्वही ।। ब्रह्मदेवे पंचांग सांगावे ।। इंद्रे पुष्पहार गुंफावे ।। रावणाच्या गळा घालावे ।। तोषवावे सकळीके ।। चंद्राने छत्र धरावे ।। सूर्याने दीप पाजळावे ।। वरुणाने उदक भरावे ।। तीर्थसमुद्रालागोनी ।। अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ ।। क्षालन करावे तत्काळ ।। गणपतीने पशु सकळ ।। रावणाचे राखावे ।। वायुने रावण गृहिची धूळ ।। सर्वदा केर काढावा सकळ ।। षष्ठीदेवतेने तत्काळ ।। बाळंतपण करावी ।। ऐशी सहस्त्र स्त्रिया जाण ।। एकलक्ष पुत्रसंतान ।। सव्वा लक्ष पौत्रप्रमाणे ।। रावणाचे असती पै ।। अष्टभैरव जे का प्रबळ ।। रावणाचे ते कोतवाल ।। त्यांनी  जागुनी  केवळ ।। चौकी पहारा करावा ।। मल्लारी देव जाण ।। तेणे करावे केश कृंतन ।। नवग्रहां नीही  मिळोन ।। अज्ञेकरून वर्तावे ।। या प्रकारे कार्यार्थी केले ।। कितीएक बंदी घातले ।। देवऋषी त्रास पावले ।। शरण गेले ब्रह्मयासी ।। तेणे विष्णूसी प्रार्थिले म्हणून ।। राम लक्ष्मण जाहले उत्पन्न ।। त्यांनी युद्ध केले दारूण ।। लंकेवरी रावणाशी ।। इंद्रजीत कुंभकर्ण ।। या गोघांचे केले हनन ।। परी रावणासी मरण ।। कैसे होय कळेना ।। रावणासी अमरत्वाचा वर ।। हृदयी अमृतकलश साचार ।। संग्रामी त्याचे छेदिता शीर ।। पुन्हा उत्त्पन्न पै होय ।। तेव्हा राम चिंताक्रांत जाहले ।। सर्व देवांसी संकट पडले ।। मग ब्रह्मदेवे जागृत केले ।। महामायेसी ते काळीं ।। रामासी व्हावा जय प्राप्त ।। रावणासी मृत्यू निश्चित ।। म्हणवून ब्रह्मदेव त्वरित ।। जागृत करिता जाहला ।। आश्विन शुक्ल प्रतिपदेसी ।। देवी जागृत झाली निशी ।। चंद्रदर्शन नसता रात्रीसी ।। जागी जाहली महामाया ।। म्हणोनी चंद्राचे दर्शन ।। ते दिवसी न घ्यावे आपण ।। असो रामासी जय होईल जाण ।। ऐसा वर दिधला ।। मग सर्व देव ऋषी मिळोनी ।। निश्चय केला अपुले मनी ।। रावण मरेपर्यंत सर्वांनी ।। आराधावी जगदंबा ।। ऐसा सर्वांनी निश्चय करून ।। मग मांडियेले अनुष्ठान ।। कालाश्स्थापन देविपूजन ।। चंडीपाठ आरंभिला ।। कुमारीपूजान उपोषण ।। यथाशक्ती ब्राह्मण भोजन ।। सर्व देव ऋषी मिळोन ।। अनुष्ठान चालविती ।। इकडे देवीचे आज्ञे करून ।। युद्ध मांडिले  अतिदारूण ।। सप्त दिवस पर्यंत जाण ।। अहोरात्र युद्ध केले ।। मग अष्टमी दिवसी देख ।। मरण पावला दशमुख ।। कोट्यावधी योगीनिंसह सुरेख ।। तै प्रकट जाहली जगदंबा ।। ब्रह्मा आदिकरुनी देव ।। तेव्हा आनंदले सर्व ।। नानापरींचे वर अपूर्व ।। पावुनी स्तविती देवीते ।। मग देवीच्या अज्ञेकरून नवमीसी ।। होम पारणे सारुनी ।। देविकारणे बलिप्रदान ।। केले अपराण्हि देवांनी ।। इकडे रामे बिभीषणाला ।। लांकाराज्यी स्थापन केला ।। मग दिव्य देवूनी सीतेला ।। निघता जाहला सुमुहूर्ते ।। अश्विन शुक्ल दशमी जाण ।। सायंकाळी नक्षत्र श्रवण ।। विजय नामाचा काल पूर्ण ।। तारकाउदयी जाणावा ।। तो विजय काल सकळीक ।। सर्वकार्यार्थसाधक ।। प्रयाणमुहूर्ती विशेषक ।। सर्व कामना सिद्ध होती ।। विजयकालाची म्हणुनी ।। विजयादशमी म्हणती जनी ।। तो विजयमुहूर्त पाहुनी ।। निघता जाहला काकुत्स्थ ।। सर्व देवासहित जाण ।। करोनिया शमीपूजन ।। केले शमिसी प्रिय भाषण ।।मग पुष्पकी बैसला ।। इशान्येसी केले गमन ।। आला अयोध्येलागून ।। सर्व सुह्यदादिजना भेटोन ।। राज्य करिता जाहला ।। सर्व देव ऋषींसी आनंद ।। जाहला तुटले अवघे बंध ।। सीमोल्लंघन केले प्रसिद्ध ।। स्वेच्छाचारे दशमीसी ।। या कारणास्तव जाण ।। विजयादशमीसी पूजन ।। करावे ईशान्येसी सीमोल्लंघन ।। शमीपूजने  जयप्राप्ती  ।। नवरात्री आणि विजयादशमीस ।। महापूजा करावी विशेष ।। त्या पूजेच्या करणे अवश्य ।। वार्षिकी पूजा म्हणावी ।।

Thursday, 22 September 2011

sadeteen pithe





महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे


महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे 

कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई)
माहूरगडची रेणुका (एकविरायमाई)
तुळजापूरची भवानी
वणीची सप्तशृंगी 
हि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे होत.
हि साडेतीन शक्तिपीठे म्हणजे  काराचे सगुण रूप आहे कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते कारामध्ये सार्धत्रय (साडेतीनमात्रा आहेतत्याप्रमाणेच साडेतीन शक्तिपीठे क्रमशः अशी आहेत : 
मातापूर 
तुळजापूर 
) कोल्हापूर
सप्तशृंगी
''कार पीठ माहूर ''कार  पीठ तुळजापूर ''कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी
सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठसात शिखरांच्या समुदायास सप्त श्रुंग म्हणून ओळखले जातेयातील एका अतियूच्च शिखरावार देवीचे मूळ स्थान आहेपण ते ठिकाण अतिशय दुर्गम असल्यामुळे वर्षातून एकदा चैत्रपौर्णिमेला ध्वज लावण्यासाठी एकच व्यक्ती मूळ स्थानाला जातेपुराणातील वरणनाप्रमाने ह्याच शिखरावर मार्कंडेय ऋषींनी घोर तप केले होतेत्यांच्यावर कृपा करण्यासाठी देवी इथेच प्रकट झाली होतीते मूळ स्थान अत्युच्च शिखरावरतीच आहेह्या ॐकार पर्वतावर चढून जाणे आजही कठीण आहेमांडूक्य उपनिषदानुसार साडेतीन मात्रा ॐकार स्वरूपी प्रतिक रूप या शक्तीपीठावरती साधना करणार्यांना भक्ती  मुक्ती दोन्ही बरोबरच मिळतात.
माहुरची रेणुका महाकाळी पीठ आहेसप्तशतीच्या प्राधानिक रहस्यात वर्णन केलेल्या महाकालीच्या दहा नावात एकवीरेचे नाव आहेएकविरा म्हणजेच रेणुका किंवा यमाई होयकोल्हापूर महालक्ष्मीचे शक्तीपीठ आहेतुळजा भवानी महासरस्वतीचे रूप आहेसात मातृका अर्ध मात्रा स्वरूपी  अर्ध पीठ सप्तशृंगी आहे
तुळजा भवानी शिवरायांची आराध्य दैवता  महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी आहेपुराणात या देवीची तीन नावे आढळतात 'त्वरिता', 'तुरजा', ' तुळजा'. त्वरित म्हणजे शीघ्र प्रसन्ना होणारी 'त्वरिताआणि भक्तांच्या हाके सरशी धावणारी 'तुरजा'. 'तूरम्हणजे त्वरित + जा म्हणजे जाणारीत्वरित धावणारी ती ' तुरजा'. ' तुरजाया शब्दाचा अपभ्रंश 'तुळजाझाला (-लयोर्भेदः ).
कोल्हापूरला आद्य मातृशक्तीचे मुख्य स्थान म्हणतातया क्षेत्राला 'महामातृका पीठ 'दक्षिण काशीम्हणून ओळखले जाते.
श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील रचना चक्रराज (श्री यंत्रप्रमाणे सर्वतो भद्र मंडल प्रमाणे आहेया मंदिरात पाच शिखरे  तीन मंडपे आहेतगर्भ गृह मंडपमध्य मंडप  गरुड मंडप हे तीन मंडप होतप्रमुख  विशाल मंडपा मध्ये १६ x १२८ स्तंभ कलाकुसरींनी युक्त आहेत.
 माहूरला मातापूर असे म्हणतातयाच क्षेत्री भगवान दत्तात्रेय नित्य भिक्षाग्रहण (भोजनकरतातया कुंडातूनसती कुंडातून परशुरामाच्या पुत्र प्रेमापोटी,वात्सल्यापोटी देवी रेणुका प्रकट झालीइथे केवळ देवीचा चेहराच आहे पूर्ण मूर्ती नाहीकेवळ शिरोभागच आहे.
ऋग्वेदातील उषासुक्तामध्ये उशाला आदितीमुखा म्हटले आहेहिलाच अनार्वा  दिव्या गौम्भ नावाने संबोधिले जातेरेणुका हे देवमाता अदितीचे रूप आहे  म्हणून या क्षेत्राला मूळपीठ म्हणतातवेदात रेणुकेचा उल्लेख नाही पण महर्षी जमदग्नी याचा उल्लेख वारंवार आढळतोजमदग्नी हा प्रत्यक्ष शिवाचा अवतार मंत्रदंष्ट्रा ब्रह्मर्षी होतऋग्वेदाचा दशमंडलाचा द्रष्टा तसेचउश्मांड हवन विधीचा प्रचारक तसेच ससर्परी विद्या आणि श्राद्ध विधीचा रचयिता महर्षी जमदग्नी हे होतमहर्षी जमदग्नीचे आश्रम  रीशिकुल जिथे जिथे होत तिथे तिथे रेणुका मातेचे स्थान आहेततरी पण मूळ स्थान म्हणजे सती स्थान माहूर किंवा मातापूर हेच मुख्य आहेरेणुका हि अग्नी तत्वाशी संबंधित आहेअग्नी ज्वालावर अधिष्ठित  अग्नी ज्वालावर परीवेश्ठीत रूपाचे वर्णन सर्वत्र आढळते त्यामुळे रेणुका हि अग्नी देवता आहेदेव माता अदिती हि प्रलायाग्निवर आरूढ  अग्नीवलयांकित आहेत्या प्रमाणे चीदग्नी अग्नी संभवा रेणुका  जमदग्नी बरोबर विवाह बद्ध झालीसूर्य  अग्नी देव तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतरलेविवाहाच्या वेळी दोघांनी श्रवताग्नी  चेताग्निचे व्रत ग्रहण केले  शेवट पर्यंत ते व्रत केले शेवटी  हि अग्नीच्या चिताग्नी मध्ये लुप्त झाली  पुन्हा अग्नी मधून प्रगटली भक्त कल्याणासाठी शाश्वत रुपात प्रतिष्ठित झाली ते क्षेत्र म्हणजे माहूरभगवती अदिती रेणुकामूळशक्तीअनादी शक्ती  पराब्रःमेची महाशक्ती आहेदशावतारा मध्ये वामन  परशुराम हे दोन अवतार ब्राह्मण कुलसंभूत अवतार आहेतदोघांची माता अदिती  रेणुका होयपरशुरामाच्या कारणामुळे पुत्र वत्सला पृथ्वीवर सदैव अधिष्ठित रेणुका हीच होयसर्व देवी देवता अवतार कार्य समाप्ती नंतर निजधामास गेले पण रेणुका देवी अंतर्धान पावल्यावर मातेच्या ममतेने पुन्हा पृथ्वीवर प्रगटली ती कायमचीच

स्वतः आदीशक्ती स्वरूपिणी , पतीदेव साक्षात शिव आणि पुत्र परशुराम म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतारहा त्रिवेणी संगमआदिशक्ती सती जाताना प्रत्यक्ष महाविष्णू(परशुराममंत्राग्नी देत आहेतसृष्टी संचालक त्रिदेव दत्तात्रेय सती कर्माचे पौरोहित्य करीत आहेत असा अद्भुत प्रसंग विरळाच.
सतीच्या शरीराचे श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राने तुकडे केले ते जिथे जिथे पडले ती सर्व ठिकाणे शक्तिपीठे बनलीमाहूर क्षेत्री सतीचे स्तनद्वय पडलेमातृदेहा मध्ये वात्सल्य रसाचे स्थान म्हणजे स्तनद्वय किंवा पयोधर होयया मातृत्वाच्या वात्सल्याचे मूळ ठिकाण म्हणजे पुरःस्थल म्हणजेच माहूर.